अल्पवयीन मतिमंद मुलावर अत्याचार प्रकरणी आरोपीला कोठडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भिंगार येथील एका अल्पवयीन मतिमंद मुलावर पैशाचे आमिष दाखवून साठ वर्षीय नराधमाने अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी, दि. २५ सायंकाळी ६ ते ७ वा. सुमारास घडली. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी रामेश्वर सिंग गंगानाथ सिंग राठोड (वय ६० रा. वैद्य कॉलनी, भिंगार) याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमारे हजर केले असता त्याला दि. २९ ऑगस्ट पर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, वैद्य कॉलनीतील रामेश्वर सिंग राठोड याने एका १५ वर्षीय अल्पयीन मुलाला पैशाचे आमिष दाखवून त्याच्या मतिमंदपणाचा फायदा घेवून घरात बोलावून त्याच्यावर लैगिंक अत्याचार केला. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भादवि ३७७ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी रामेश्वरसिंग राठोड याला अटक करण्यात आली असून, त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता दि. २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि कैलास देशमाने हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.