कैकाडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बापट आयोगानुसार कैकाडी समाजाचे क्षेत्रबंधन उठविण्यात यावे व त्यांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्याची शिफारस करण्यासाठी आयोगाची एकमताने शिफारस आहे, तसा अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी होण्यासाठी तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयामसमोर एक दिवसी धरणे आंदोलन करण्यात आले.



याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष रोहिदास जाधव, सचिव शरद माने, संस्थापक अध्यक्ष संजय मेडे, नारायण जाधव, दिलीप जाधव, किरण माने, नागेश्‍वर गायकवाड, निरज जाधव, निलेश जाधव, संदिप माने, नितीन गायकवाड, संदिप माने, लिला जाधव, रुख्मीणी माने, मंदा जाधव, सुशिला जाधव, ताराबाई माने आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कैकाडी समाज कसत असलेल्या गायरान जमिनी त्यांच्या नावे करुन द्यावेत. मुद्रा लोन समाजातील युवकांना विनाअट मंजुर करावे. कैकाडी समाजावरील वाढते अत्याचार व हल्ले थांबविण्यात यावेत. कैकाडी समाजाला घरकुल योजना व समान शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा आदिंसह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.

आजही कैकाडी समाजातील लोक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत. तसेच आर्थिक, सामाजिक स्थितीही बेताची आहे. समुहातील आजही काही लोकांना गुन्हेगार समजण्यात येते, त्यामुळे शासनाने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.