जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
आगामी काळात अहमदनगर तसेच नशिक व पुणे जिल्हयात पावसामुळे वा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्हयातून वाहणा-या गोदावरी, भिमा, घोड, कुकडी, प्रवरा, मुळा व सिना तसेच इतर नदयांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील नागरिकांना मदत व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.
स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पुर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुन्या /मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी, वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री क्रमांक 1077 आणि दुरध्वनी क्रमांक 0241-2323844 व 2356940 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
--------------------------------