उच्च न्यायालयाने डॉक्टरांची याचिका स्विकारली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिकेतर्फे सध्या नगर शहरातील हॉस्पिटलच्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याची कारवाई सुरू असताना ही कारवाई चुकीची असून याप्रकरणी डॉ. प्रकाश कांकरिया यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये डॉक्टरांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी मागणी श्री. कांकरिया यांनी केली असता त्यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी मनपा प्रशासनास नोटीस बजावण्यात आली असून दि. ६ सप्टेंबर रोजी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. 


याबाबत अधिक माहिती देताना श्री. कांकरिया म्हणाले की, सध्या शहरातील हॉस्पिटलांवर जी कारवाई सुरू आहे त्याबाबत आम्ही रीट याचिका दाखल केली असून ही याचिका फेटाळण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. सुनावणी दरम्यान डॉक्टरांना भूमिका मांडण्याची संधी मिळण्याची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यामुळे आता डॉक्टरांना आपली भूमिका मांडता येणार असल्याचे श्री. कांकरिया यांनी सांगितले.

तसेच महापालिकेस उच्च न्यायालयाने आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली असून याबाबतची नोटीस मनपा प्रशासनास पाठविण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हॉस्पिटलच्या बांधकामांवर हातोडा टाकण्याची अथवा कारवाई करण्याचे कोठेही म्हंटले नसून या निर्णयाचा चुकीचा अर्थ मनपा प्रशासनाने लावला असल्याचे त्यांनी सांगितले. 

मनपा प्रशासनास दि. ६ सप्टेंबर रोजी आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले असून सदर प्रकरणी न्यायप्रविष्ठ असताना मनपा प्रशासनाची कारवाई चुकीची असून ज्यांनी रीट याचिका दाखल केली आहे त्यांच्यावर न्यायालयात जो पर्यंत बाजू मांडत नाही तोपर्यंत कारवाई करणे योग्य नसल्याचे श्री. कांकरिया यांनी म्हंटले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.