पोलिस कर्मचाऱ्यास ३५ हजारांची लाच घेताना पकडले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस हेड काँन्स्टेबल राजु पुंड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शुक्रवारी (दि.२५) दुपारी पोलिस ठाण्यासमोरील हॉटेल कानिफनाथमध्ये ही कारावाई करण्यात आली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जांभळी गावात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल असून यामधील साक्षीदारावर आरोपीने दबाव आणल्याची तक्रार आहे. याबाबत पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर करावयाचा होता. आरोपीच्या बाजुने अहवाल देण्यासाठी पोलिस काँन्स्टेबल यांनी ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केली होती. 

शुक्रवारी लाचेची ३५ हजाराची रक्कम पुंड यांनी तक्रारदाराकडुन हाँटेल कानिफनाथ येथे स्विकारली. यावेळी पुंड यांना पैसे घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक विष्णु ताम्हाणे, पोलिस निरीक्षक श्याम पवरे, नितीन दराडे, तन्वीर शेख, एकनाथ आव्हाड, राजेंद्र सावंत, प्रशांत जाधव, दत्तात्रय बेरड यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.