अशोक लांडे खूनप्रकरण -अमोल कोतकरचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अमोल भानुदास कोतकर याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. बहुचर्चीत अशोक लांडे खून प्रकरणात कोर्टाने भानुदास कोतकर, संदीप कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर यांना एप्रिल २०१६मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


सध्या नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये कोतकर पिता-पुत्र शिक्षा भोगत आहेत. नाशिक कोर्टाच्या या शिक्षेविरोधात कोतकरांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यानंतर कोतकर यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले. 

मुंबई खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्या. सय्यद यांच्या खंडपीठाने नाशिक न्यायालयाचे निकालपत्र व पुरावे पाहून जामीन अर्ज सप्टेंबर २०१६ मध्ये फेटाळले. वर्षभराच्या कालखंडानंतर अमोल कोतकर याने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला. जेष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल, यांच्यासह सात वकिलांनी कोतकर यांची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली.

सुप्रीम कोर्टाचे न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जामीन देण्यासाठी कायदेशीर व योग्य ग्राऊंड नसल्याचे स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत जामीन अर्ज फेटाळला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.