25 वर्षीय युवकाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  25 वर्षीय युवकाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास शिर्डी शिवारातील देशमुख चारीजवळ घडली. नानासाहेब लहानू लोणारे असे मृताचे नाव आहे.

मंगळवारी रात्री शिर्डी शिवारातील देशमुख चारी नंबर 11 येथे कोपरगाव तालुक्‍यातील टाकळी येथील 25 वर्षीय युवकाचा खून झाला. नानासाहेब लोणारे याच्या गळ्यावर, तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. मृतदेह पाण्यात पडलेला आढळला. मयताच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलिसांत याबाबत तक्रार दिली. अज्ञात मारेक-याविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला.

घटनेनंतर तातडीने शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.