शिर्डी विमानतळाचे 'साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ' नामकरण.



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिर्डी येथील 'शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे 'श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट' म्हणजेच श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ऑक्टोबर-२०१७ पासून श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व सुरु होणार आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता हे विमानतळ लवकरच सुरु करण्याचे नियोजन आहे. या विमानतळाच्या नामकरणाचा ठराव श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनी करुन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठवला. हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

विमानतळांच्या नावात बदल करण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित येते. नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शिफारशीसह हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.