कोपरगावात मनसे कार्यकर्त्यांची चिखलाने आंघोळ


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव शहरातील मार्केटयार्ड रस्त्याच्या दुरवस्थेकडे नगरपालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चिखलाने आंघोळ केली. चिखलातच सत्यनारायण पूजा करून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला. पालिकेकडे वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा असा अनोखा मार्ग निवडला.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतीश काकडे, अलिम शहा यांनी स्वतः चिखलाची उधळण करीत स्वतःच्या अंगावर चिखल माखून घेतला. पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत घोषणा दिल्या. गोदावरी पेट्रोलपंप ते जुना टाकळी नाका या दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. पालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम सामान्य नागरिकांना होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले. हा रस्ता म्हणजे घसरगुंडी झाली आहे. खड्डे कमी झाले पण मातीमिश्रीत मुरूम, खडी टाकल्याने नागरिकांना या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे.

दरम्यान, पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करून पालिका प्रशासनासह सर्वांचे लक्ष वेधले. रस्त्यातील चिखलामध्ये सत्यनारायणाची पूजा मांडून त्या पूजेला फुलाऐवजी चिखल वाहून त्याच चिखलाचा अभिषेक मांडलेल्या चौरंगाला घातला. कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात घोषणा देत रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.