राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मंजुषा गुंड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंजुषा गुंड यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाव्दारे सांगितले आहे.



सौ.मंजुषा गुंड यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले असल्याने तसेच संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क आहे त्यामुळे पक्षसंघटना वाढीस निश्चितीच फायदा होईल.राष्ट्रवादी काँग्रेस महिला च्या प्रदेशाध्यक्षा सौ.चित्रा वाघ यांचे हस्ते व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधिमंडळ गटनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, जिल्हा प्रभारी दिलीपरावजी वळसे पाटील आणि पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांचे उपस्थितीत लवकर च अधिकृत नियुक्तीपत्र गुंड दिले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष घुले पाटील यांनी प्रसिद्दीपत्रव्दारे कळविले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.