दूषित पाण्यामुळे तळेगाव प्रादेशिक योजनेचा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील दुष्काळपीडित वीस गावाना तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, योजनेचा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद आहे. त्यामुळे लाभार्थी गावांना दुषित पाण्याचाच पुरवठा केला जातो. दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्याच्या उंबरठ्यावर आहे.

तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा जलशुद्धीकरण प्रकल्प व क्लोरीन प्रकल्प बंद आहे. केवळ टीसीएल पावडर टाकून लाभार्थी गावांना थेट पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामस्थांना गढूळ व शेवाळयुक्त पाणी प्यावे लागते.

लाभार्थी गावांना दुषित पाण्याच्या पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून जलजन्य आजारांची भीती व्यक्त होत आहे. अनेकांना मुतखड्याचे विकार झाले आहेत. लाभार्थी गावांच्या आरोग्याच्या बाबतीत योजना समिती मात्र बेफिकीर असल्याचे दिसते. 

योजनेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प दुरुस्तीचे काम केव्हा होणार हा प्रश्नच आहे. जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्तीच्या आर्थिक आधारावर सध्या ही योजना सुरु आहे. लाभार्थी वीस गावांना योजनेद्वारे शुद्धीकरण न करताच थेट पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. 

दुषित पाणी प्यावे लागत असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. योजनेच्या साठवण तलावातील पाणी नमुन्याची तपासणी करण्याची गरज आहे. नाईलाजाने ग्रामस्थ दुषित पाणी पितात. दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची पर्वा कुणालाही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.