जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाचे अपर सचिव रा. वि. फणसेकर यांनी जाहीर केला. या ग्रामपंचायतींत 23 सप्टेंबरला मतदान, तर 25 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.



सप्टेंबर महिन्यात राज्यातील 13 जिल्ह्यांतील 114 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. यात नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्‍यातील केंदन खुर्द, कोपरगाव तालुक्‍यातील भोजडे, नेवासे तालुक्‍यातील हंडी निमगाव, पाथर्डी तालुक्‍यातील कोरडगाव, सोमोशी, जिरेवाडी, पारनेर तालुक्‍यातील पुणेवाडी व पळशी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

त्यानुसार गुरुवारी (दि. 24) तहसीलदार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील. चार ते आठ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. 11 सप्टेंबरला त्यांची छाननी होईल. 13 सप्टेंबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत राहील. 

याच दिवशी निवडणूक चिन्हे नेमून देऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 23 सप्टेंबरला मतदान, तर 24 सप्टेंबरला मतमोजणी होईल. 27 सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.