पैसे दुप्पट करण्याचे आमिष; १ कोटीला गंडा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मार्केटयार्ड परिसरातील जनसहारा मल्टीस्टेट ॲग्रो पर्पल्स को.ऑप. सोसायटीचे अध्यक्षांसह संचालक अशा ९ जणांविरुद्ध ६ वर्षांत दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १९) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जनसहारा मल्टीस्टेट ॲग्रो पर्पल्स को.ऑप. सोसायटीच्या अध्यक्षा वंदनासिंग कुशवाह (रा. भोपाळ, मध्यप्रदेश), संचालक निर्मला सोनी (रा. कालापिपल मंडी, मध्यप्रदेश), जस्पालसिंग संदू(रा. ग्वॉल्हेर, मध्यप्रदेश), नरंजन सक्सेना, प्रेम गिबनरे, विवेक माधूर, मयेक जोहरी, सुधीरकुमार पाल व मनवीर सिंग (रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध पैशाची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तात्रय अप्पाजी दहिफळे (वय ५०, रा. महिदा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंपनीच्या योजनांच्या माध्यमातून ६ वर्षात पैसे दुप्पट मिळतील असे आमिष गुंतवणुकदारांना दाखविण्यात आले. याबाबतचे प्रमाणपत्रही गुंतवणुकदारांना देण्यात आले. मात्र मुदत संपूनही पैसे न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणुकदारांचे लक्षात आले. 

या प्रकरणी श्री. दहिफळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यामध्ये आत्तापर्यंत गुंतवणुकदारांची १ कोटी ४ लाख ६७ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाली आहे. तसेच आणखी अनेक गुंतवणुकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीच्या अध्यक्षा व संचालकांचा शोध पोलिस घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास स. पो. नि. प्रकाश पाटील हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.