बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील बोटा येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. सुरेखा ऊर्फ मंगल सचिन मुसळे (वय २७) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा येथील सुरेखा ऊर्फ मंगल मुसळे ही महिला गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात कोणाला काही न सांगता ती घरातून निघून गेली. तिच्या घरच्यांनी तिचा सगळीकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या विहिरीतील पाण्यावर तिच्या चपला तरंगतांना दिसल्या. त्यानंतर या विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. 

याप्रकरणी मनोज उत्तम मुसळे (रा. बोटा) यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.