भिडे गुरूजींची आज नगरला जाहीर सभा.



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजता सावेडीतील प्रोफेसर चौका लगतच्या जॉगिंग पार्क मैदानावर संभाजीराव भिडे गुरूजी यांची जाहीर सभा होणार आहे. 


दुर्गराज श्रीरायगड येथे ३२ मण सुवर्ण सिंहासन निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला, असून त्याच्या पूर्तीसाठी भिडे गुरूजींची ही जाहीर सभा होत आहे. सुवर्ण सिंहासनाची निर्मिती का करावयाची ? या सिंहासनाचे संरक्षण कसे करण्यात येणार आहे ? अशा कुतूहल असलेल्या मुद्यांवर भिडे गुरूजी या सभेमध्ये नेमकेपणाने मार्गदर्शन करणार आहेत. सुवर्ण सिंहासनासाठी ऑनलाइन देणगी स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन ॲड. ऋषभ गादिया, राम नळकांडे, दातीर वस्ताद, विठ्ठल सातपुते, देविदास मुदगल, दिनेश जोशी, नंदकुमार राजेभोसले, विनोद काशिद, संकेत वाघस्कर, नीलेश काटे, अमोल शिंदे यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.