केबल चोरणाऱ्या सात जणांची टोळी जेरबंद.
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर जवळील सुझलॉन पवन उर्जा प्रकल्पातून (दि.१३ रोजी) रात्री टॉवर क्रमांक बी.ए.१९ चा सप्लाय रात्री ३ वाजता बंद झाला. इंजिनिअर राजेंद्र साबळे यांच्या आदेशावरून रात्रपाळीचे सुरक्षा रक्षक संतोष लंके व विक्रम काळे त्या ठिकाणी गेले असता. टॉवर रुमचे लॉक व कडी तुटलेली होती. तसेच २४० एम.एम.ची १६५ मीटर कॉपर केबल (तांब्याची तार) चोरीस गेल्याचे लक्षात येताच, त्वरित सदर चोरीबाबत कंपनीचे मॅनेजर तुकाराम झावरे यांना कळविले व सुपा पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली.
सुरक्षारक्षक संतोष भिका लंके (वय ४० वर्षे.रा.हंगा) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध केबल चोरीचा गुन्हा नोंदवून, पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना सुपा बसस्थानकाजवळील घरात कॉपर वायरचे काळे कव्हर,हेक्सा ब्लेड,रबरी ग्लोज,पान्हे वगैरे साहित्य आढळून आले.
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
सुरक्षारक्षक संतोष भिका लंके (वय ४० वर्षे.रा.हंगा) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध केबल चोरीचा गुन्हा नोंदवून, पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना सुपा बसस्थानकाजवळील घरात कॉपर वायरचे काळे कव्हर,हेक्सा ब्लेड,रबरी ग्लोज,पान्हे वगैरे साहित्य आढळून आले.
सदर केबल कव्हर सुझलॉन कंपनीच्याच केबलचे असल्याची खात्री करून याबाबत अधिक माहिती घेतली असता. नीलेश दळवी यांच्या टाटा एस टेम्पोतून केबलची वाहतूक करून, ती मुकुंदनगर भागात राहणारा जुनेद जलिल खान यास २३० रुपये किलो दराने ६० हजार रुपये किमतीस विकल्याचे प्रमोद गिरी व प्रशांत करंजुले यांनी सांगितले.
सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी चोरीस गेलेली २६५ कि.ग्रॅ.वजनाची कॉपर केबल जप्त करून आरोपी नयन राजेंद्र तांदळे (वय २३ वर्षे, रा.सावेडी अ.नगर), विठ्ठल भाऊसाहेब साळवे (वय २४ वर्षे रा.घोडेगाव ता.नेवासा), रामदास दिलीप पवार (वय ३०वर्षे, रा.पवारवाडी सुपा), नीलेश अण्णासाहेब दळवी (वय १९ वर्षे, रा.हंगा ता.पारनेर),भूषण माधव पवार (वय २२ वर्षे, रा.सुपा), प्रमोद तात्या गिरी (वय २६वर्षे, रा.हंगा), प्रशांत सुभाष करंजुले (वय २४ वर्षे,रा.पाडळी रांजणगाव) यांना अटक केली.
त्यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीची १६५ मीटर कॉपर केबल ताब्यात घेतली आहे. सदर चोरी तपास प्रक्रियेत पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक राजेश मनतोडे, हे कॉं.डी.बी. शेरकर, बाळासाहेब गोसावी, सुखदेव दुर्गे,अजय नगरे,दत्तात्रय गावडे,खंडेराव शिंदे ,भाऊसाहेब शिंदे आदींचा सहभाग होता. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस करत आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
--------------------------------