संगमनेरातील दोन पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर येथील दोन पत्रकारांवर वीस हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका जणाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ पत्रकारांनी पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांना निवेदन दिले.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पत्रकार अंकुश बुब व राजा वराट यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्यांकडे वीस हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या भीतीपोटी कतारी यांनी बुब व वराट यांना दहा हजार रुपये दिले होते; मात्र राहिलेल्या दहा हजार रुपयांसाठी वारंवार मागणी होऊ लागली. ही रक्कम देण्यास कतारी यांनी नकार दिला.

त्यानंतर दोघांनी सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी वृत्तपत्रात कतारी यांच्याविरुद्ध मजकूर प्रसिद्ध केला व तो व्हाट्सॲपद्वारे प्रसारीत केला. याबाबत कतारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ उंबरकर करीत आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.