लिंपणगाव शिवारात आढळला अनोळखी मृतदेह


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तालुक्यातील श्रीगोंदा काष्टी रेल्वे ट्रॅकवर लिंपणगाव शिवारात एक अंदाजे ३८ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत रेल्वे पोलीस देवेंद्र खेडगीकर यांनी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फोन करून लिंपणगाव शिवारात रेल्वे रुळावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याबाबत माहिती दिली.

त्यावरून पोलिसांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून. सदर व्यक्तीचा मृत्यू कसा झाला.ही अज्ञात व्यक्ती कोण आहे. याचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल झुंझार हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.