कोपर्डी बलात्कार प्रकरण - सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डीतील सामुहिक अत्याचार व खून प्रकरणातील संशयीत आरोपींनी विशेष सरकारी वकिलांची साक्ष घेण्याविषयी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे खटल्यातील अडथळे दूर झाले आहेत.

कोपर्डी (जि. नगर) येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार व खून प्रकरणाने सबंध राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. विशेषतः याबाबत मराठा समाजाने राज्यभर मूकमोर्चे काढल्याने शासन यंत्रणा हादरली. त्यावर विशेष न्यायालयात खटला चालवून वर्षभरात तो निकाली काढला जाईल. विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

मात्र यातील संशयीत पप्पू शिंदे व अन्य तीन आरोपींच्या वकिलांनी या खटल्याबाबत सातत्याने कालापव्यय करण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक भाग म्हणून सरकारी वकिल ऍड निकम यांची साक्ष घेण्याची मागणी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे खटल्याच्या कामकाजाला वेग येईल.

'या खटल्यातील आरोपींनी खटल्यात काहींची जबानी घ्यावी अशी मागणी केली होती. ती फेटाळली आहे. त्यामुळे आता लवकर निकाल लागेल.'- ऍड उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.