राष्ट्रवादीच्या वतीने स्वातंत्र्यता दिवस साजरा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रारंभी सकाळी चितळे रोड येथील आ.संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालया समोर राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सुमतीलाल कोठारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, रेशमा आठरे, रेखा जरे, साधना बोरुडे, हनिफ जरीवाला, फारुक रंगरेज, प्रकाश भागानगरे, बाबासाहेब गाडळकर, पै.पवन भिंगारे, वैभव ढाकणे, सारंग पंधाडे, अजय चितळे, साहेबान जहागीरदार, अशोक नांदूरकर, मारुती पवार, कुमार नवले आदि उपस्थित होते. 

तसेच नगर-पुणे महामार्गावरील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून, स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणार्‍या शहीदांना अभिवादन करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.