आरोपी संतोष भवाळचे वकील गैरहजर : १० हजारांचा दंड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बहुचर्चीत कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु झाली आहे. बुधवार, दि. ३० रोजी या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी साक्षीदार रवींद्र चव्हाण गैरहजर होते. तसेच आरोपी संतोष भवाळचे वकील ॲड. बाळासाहेब खोपडे हे देखील गैरहजर होते. न्यायालयाने आरोपी भवाळ याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी दि. ४ सप्टेंबरला होणार आहे. 


कोपर्डी खटल्याची नियमित सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांचेसमोर सुरु झाली आहे. बुधवार, दि. ३० या खटल्याच्या वेळी साक्षीदार यशदाचे निवृत्त अधिकारी गैरहजर राहिले. तसेच आरोपी संतोष भवाळचे वकील ॲड. बाळासाहेब खोपडे हे देखील गैरहजर होते. त्यामुळे कोर्टाने आरोपी संतोष भवाळ याला १० हजाराचा दंड ठोठावला असून पुढील सुनावणी दि. ४ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. 

आरोपी संतोष भवाळ याने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचेसह पाच जणांच्या साक्षीसाठी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. कोर्टाने ते अपील फेटाळल्याने या खटल्याची नियमित सुनावणी सुरु झाली आहे. कोपर्डीच्या बातम्यांची सीडीज बनवणारे यशदाचे निवृत्त अधिकारी रवींद्र चव्हाण यांची साक्ष बुधवारी (दि. ३०) घेण्यात येणार होती. मात्र चव्हाण गैरहजर राहिले. तसेच आरोपी भवाळचे वकील खोपडे गैरहजर होते. यावेळी न्यायालयात सरकारपक्षाचे वकील ॲड. उज्ज्वल निकम हजर होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.