शेवगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्‍यातील हातगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याच्या घटनेने शेवगाव तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. याबाबत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादवरून पोलीसांनी बाल लैंगिक अत्याचाराच प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून संभाजी भराट याला पोलीसांनी अटक केली आहे.

या आरोपीने हातगाव शिवारातील पत्र्याच्या घरात दि. 27 जुलै ते 12 आँगस्ट दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. या मुलीस मारण्याची धमकी दिली व बळजबरीने अत्याचार केला. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराच प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.या आरोपीस पोलीसांनी अटक केलेली आहे. या आरोपीस पोलीसांनी न्यायालयात उभे केले असता त्यास दि.29 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल शेख करत आहेत.

या गुन्ह्याचा तपास तातडीने करुन या आरोपीस कठोर शिक्षा होईल, असे आरोपपत्र दाखल करावेत. कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता आरोपीस कठोर शिक्षा व्हावी.यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेने पोलीस उपनिरीक्षक नितीन मगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.