सरपंचांनीच थकवली घरपट्टी , उपसरपंचांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील लहीत बु।। च्या सरपंच वर्षा सोमनाथ चौधरी यांनी ग्रामपंचायत करापोटी घरपट्टीची ६ हजार ७९८ रुपये थकविले असून त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे क्र.१४ खंड (ह) चे तरतुदीचा भंग केला आहे. तरी त्यांचे सरपंचपद रद्द करावे असा तक्रार अर्ज उपसरपंच लहानू चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे.

चौधरी यांनी २१ जुलै २०१७ रोजी वकिलांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी देखील झाली असून पुढील सुनावणीची तारीख ही सरपंच व तक्रारदार उपसरपंच यांना कळविण्यात आली आहे.

चौधरी यांनी या तक्रार अर्जात पुढे असे म्हटले आहे की, सरपंच वर्षा चौधरी यांनी सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या कालावधीची ग्रामपंचायत कराची घरपट्टी रक्कम रुपये ६ हजार ७९८ रुपये थकविली आहे. ती वेळेत भरलेली नाही. त्या पदाचा गैरवापर करीत असल्याचेही अर्जात नमुद करण्यात आले आहे. प्रतिवर्षाची ३ हजार ३९९ प्रमाणे दोन वर्षाची घरपट्टी अशी एकूण ६ हजार ७९८ रुपये थकबाकी असून त्या थकबाकी भरण्यास टाळाटाळ करीत आहे. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे क्र.१४ खंड (ह) प्रमाणे कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याकडे ग्रामपंचायत कराची थकबाकी असल्यास व त्याने न भरल्यास असा सदस्य ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरतो असा दावाही या पत्रात करण्यात आला असून सरपंच चौधरी यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

यापूर्वीही लहीत बु।। येथील विवेक चौधरी यांना ग्रामपंचायत कारभारासंदर्भात जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्या अनुषंगाने चौकशी सुरु असतानाच उपसरपंचांनीही सरपंच वर्षा चौधरी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.