श्रीरामपुरात गोळीबार एक गंभीर जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एका व्यक्तीस मारण्यासाठी येण्यास नकार दिल्याने साईनाथ मोहन गायकवाड याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना रविवारी (दि. १२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मालेवाडी (अशोकनगर) येथे घडली. यात साईनाथ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

याबाबत पोलीस सुत्राकडून समजलेली अधिक माहिती अशी की, साईनाथ मोहन गायकवाड (वय ३९, रा. मालेवाडी, अशोकनगर, ता.श्रीरामपूर) हा घरी असताना आरोपी राहुल भास्कर भिंगारे (रा. अशोकनगर) हा त्याच्याकडे आला. आपल्याला गणेश शिरोळे याला मारण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. मात्र, साईनाथ याने त्यास नकार दिला. याचा राग आल्याने राहुल याने हातातील गावठी कट्ट्यातून साईनाथ याच्या दिशेने गोळी झाडली. त्यात साईनाथच्या उजव्या पायाच्या नडगीवर गोळी लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला.

यानंतर राहुल याने याठिकाणाहून पळ काढला. जखमी साईनाथ यास नातेवाईकांनी साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी साईनाथ याने दिलेल्या जबाबावरून शहर पोलिसांनी आरोपविरूद्ध गु.र.नं. २९०/२०१७, भा.दं.वि. कलम ३०७, ४५२ शस्त्रअधिनियम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.