संगमनेरात ८०० किलो गोमांस पकडले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्यासह पोलिस पथकाने चार दिवसांपुर्वी समनापूर शिवारात ४९ जिवंत जनावरे पकडल्याची घटना ताजी असतानाच शहरातील भारतनगर याठिकाणी शहर पोलिसांनी बुधवार दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पुन्हा ८०० किलो गोमांस पकडले आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील भारतनगर याठिकाणी शाहिद हाफिज शेख याच्या वाड्यात अवैधरित्या ८०० किलो गोमांस असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना समजली होती. त्यामुळे त्यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर आदी पोलिसांनी त्या ठिकाणी जावून छापा टाकला. त्यावेळी जनावरांचे कत्तल केलेले ८०० किलो गोमांस मिळून आले. पोलिसांना पाहून शेख व त्याचा जोडीदार समिर हसन कुरेशी हे दोघेही पळून गेले आहेत. एकूण ८० हजार रुपये किंमतीचे हे गोमांस आहे.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी शाहिद शेख व समिर कुरेशी या दोघां विरुद्ध गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र सहाणे हे करीत आहेत. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना देखील संगमनेर शहरात अवैधरित्या सर्रासपणे व छुप्या पद्धतीने कत्तलखाने सुरु आहेत. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे हे एकामागून एक कारवाया करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.