मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिने तुरुंगवास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घराबाहेर बोलावून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याच्या आरोपावरून, जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. नावंदर यांनी तिघाजणांना दोषी धरून सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली. या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी येथे दि. २२ सप्टेंबर २०११ रोजी भगवंत रंगनाथ माळी यांना घराबाहेर बोलावून आरोपी आजीनाथ यादव गिऱ्हे, यादव माधव गिऱ्हे, विष्णू यादव गिऱ्हे, हिराबाई यादव गिऱ्हे, संगीता यादव गिऱ्हे यांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 

यावेळी त्यांची मुलगी अरुणा दिनकर गव्हाणे,आई आशाबाई भगवंत माळी या भांडण सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही काठीने, गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत अरुणा दिनकर हे गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात भादवि ३०६, ३२६, ३२५, ३२४ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. नावंदर यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. विष्णुदास भोर्डे यांनी काम पाहिले.

फिर्यादी व तिची आई यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने आजीनाथ गिऱ्हे, यादव गिऱ्हे, विष्णू गिऱ्हे यांना दोषी धरून भादंवि कलम ३२६, ३२४ अन्वये दोषी धरून त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली. तसेच १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना तुरुंगवासाची शिक्षा दिली. तसेच आरोपी यांनी फिर्यादी अरुणा गव्हाणे, तिची आई आशाबाई माळी, वडिल भगवंत माळी यांना प्रत्येकी २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.