कोपरगाव - सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील सुनिता दत्तात्रय सोनवणे (वय २५) या विवाहितेने ५ लाखांसाठी सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळी विरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती तपासी अंमलदार ग्रामीणचे सहा. पोलीस निरीक्षक सिद्धार्थ आहिरे यांनी दिली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत सुनिता हिला पतीच्या नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून सतत केली जात होती. पैशाच्या मागणीवरून पती दत्तात्रय बाळासाहेब सोनवणे, सासरे बाळासाहेब निवृत्ती सोनवणे, सासू विमल बाळासाहेब सोनवणे, दीर उमेश बाळासाहेब सोनवणे (सर्व रा. सोनारी, ता. कोपरगाव) हे एक महिन्यापासून तिला मारहाण करून शाररीक व मानसिक त्रास देत होते.

या त्रासाला कंटाळून रविवारी (दि. २०) सकाळी आठ वाजण्याच्यापूर्वी सोनारी येथील राहत्या घराजवळील विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. सुभाष महादु दराडे (रा. करजगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मयत सुनिताचा पती दत्तात्रय सोनवणे, सासरा बाळासाहेब सोनवणे, सासु विमल सोनवणे, दीर उमेश सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर व उपनिरीक्षक सिद्धार्थ आहेर यांनी घटनास्थळी जावून पहाणी करत आरोपींना गजाआड केले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.